esakal | एक थापड दिली की पुन्हा उठणार नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

एक थापड दिली की पुन्हा उठणार नाही; मुख्यमंत्र्यांचा इशारा

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- एका चांगल्या कामाची सुरुवात मी मुख्यमंत्री पदावर असताना होईल असं मला स्वप्नातही कधी वाटलं नाही. माझ्यावर पुष्पवृष्टी होत होती, पण मी तसं करु नका म्हणून त्यांच्यासमोर हात जोडले. लोकांचे ऋण कधीही फेडता येणार नाही. चाळीची पाळेमुळं खूप खोलवर आहेत. चाळींचा खूप मोठा इतिहास आहे. अनेक मोठी लोक या चाळीने दिले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असं सांगणारे लोकमान्य ठासून सांगून गप्प बसले नाहीत. त्यांनी चळवळ उभी केली. अनेक लोक यातून पुढे आले, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. (bdd-chawls-redevelopment-construction-inauguration-uddhav-thackeray-criticize-bjp)

आपलं सरकार ट्रिपल सिट सरकार आहे. मी मुद्दामहून हे बोलत आहे. टीका ऐकायची खूप सवय झाली आहे, आता कौतुक झालं की भीती वाटते. चित्रपटातील डायलॉगप्रमाणे थप्पडसे डर नही लगता साहब, प्यार से लगता है. अशा या थापडा घेतल्या आणि दिल्या आहेत. जितक्या घेतल्या तितक्या दाम दुपटीने दिल्या सुद्धा आहेत. पुढे सुद्धा देऊ, त्यामुळे आम्हाला कोणी थापड देण्याचं बोलू नये. अशी एक थापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसैनिकाच्या रक्तातील गुण आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा: ...म्हणून शांत! नाहीतर राणेंचं तोंड दोन मिनिटात बंद करु!

आज एक मोठं काम आपल्याकडून होत आहे. गेल्या काही महिन्यात आपण ५ लाखांपेक्षा अधिक घरं ग्रामीण भागात दिली आहेत. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्त्वात हे काम होत आहे. वेगाने हे सरकार काम करत आहे. सगळ्यांचे ऋण यामध्ये आहे. शिवसेना प्रमुख सांगायचे, प्रत्येक मैदानाची वेगळी भाषा असते. या जांबोरी मैदानाने अनेक प्रसंग पाहिले आहेत. संघर्षाच्या ठिणग्या मैदानात निर्माण झाल्या आहेत. असाच एक रोमहर्षक प्रसंग आज घडतोय. चाळीचे टॉवर होतील, पण, चाळीची संस्कृती लोप पावू देऊ नका. पु.ल. देशपांडे यांनी बटाट्याच्या चाळीत चाळीचे वर्णन अद्भूत आहे. अनेकांनी चाळीकरांना घरं देण्याचं आश्वासन दिलं. पण, आज ते स्वप्न आम्ही पूर्ण करु पाहात आहोत, असंही ठाकरे म्हणाले.

loading image
go to top