

BBD Residents Rent Hike
ESakal
मुंबई : बीडीडीवासीयांना पुनर्विकासाच्या माध्यमातून सुसज्ज घरे दिली जात असतानाच आता त्यांना भाडेवाढ मिळणार आहे. पुनर्विकासासाठी चाळी रिकाम्या करणाऱ्या रहिवाशांना आता महिन्याला ३० हजार रुपये एवढे भाडे मिळणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडाने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे भाडेवाढीची मागणी करणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.