Loksabha 2019: 'सेक्सिस्ट' समाजामध्ये अभिनेत्री असणे गुन्हा का?- स्पृहा जोशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर निवडणूकीच्या रिंगणात उतरणाऱ्या स्त्री कलाकारांवर खालच्या दर्जाची टीका करणाऱ्या सगळ्यांनाच अभिनेत्री स्पृहा जोशीने धारवेर धरले आहे. तिने यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. 

दरम्यान, या सेक्सिस्ट समाजामध्ये 'अभिनेत्री' असणे हे कित्येकदा अपमानकारक पद्धतीने दर्शवले जाते. सध्या बंगालमध्ये मिमी आणि नुसरतच्या सो कॉल्ड 'रिव्हिलिंग' कपड्यांवरून त्यांना ट्रोल करणारे 'मीम्स' सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका ज्येष्ठ अभिनेत्रीबद्दल समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने म्हटले की, "त्या आपल्या 'घुंगरू' आणि 'ठुमक्यांनी' लोकांना तल्लीन करून टाकतील आणि त्यांच्या रात्री 'रंगीन' करून टाकतील!" किती भयानक वाटते हे सगळे. आणि हा प्रचार का?. असा प्रश्नही स्पृहाने आपल्या पोस्टमध्ये विचारला आहे. 

तसेच, काही अपवाद वगळता सध्या निवडणूकीच्या प्रचारात चालेला हा प्रकार थांबवण्यासाठी बायकांनीच बायकांची पाठराखण करणे गरजेचे आहे. असे आपण करणार का असाही प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to be an actress is a crime in our society says Sprha Joshi