सावधान! मुंबई, ठाणे पालघरला हवामान खात्याने दिला मोठा इशारा; रायगड, रत्नागिरीतही अंबर अलर्ट जाहीर

समीर सुर्वे
Wednesday, 12 August 2020

  • रायगड,रत्नागिरीत अतिवृष्टी
  • रविवार पर्यंत अंबर अलर्ट
  • मुंबईला पाऊस वाऱ्याचा तडाखा
  • पालघरला आज अतिवृष्टी

मुंबई: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात रविवार पर्यंत 204 मि.मी पर्यंत पाऊस होण्याची शक्‍यता आहे.या दोन जिल्ह्यांसाठी मुंबई वेधशाळेने अंबर अलर्ट जारी केला असून सर्व यंत्रणांना सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे.तर,पालघर मध्ये गुरुवारी अशी परीस्थीती राहाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तेथेही गुरुवारसाठी अंबर अलर्ट जाहीर करण्यात आला .मुंबईत पुढील दोन दिवस जोरदार पावसासह 45 ते 55 किलोमिटर वेगाने वारे वाहाणार आहेत.

समुद्रात मुर्ती विसर्जनाबाबत आली सर्वात मोठी बातमी; जाणून घ्या BMC ने काय दिल्या आहेत सूचना

मुंबई, ठाणे, सिंधूदुर्ग जिल्ह्यात रविवार पर्यंत धुवाधार पाऊस होणार आहे. मुंबईच्या उपनगरात आज जोरदार पाऊस झाला. बोरीवली येथे सर्वाधिक 156.4 मि.मी पाऊस संध्याकाळ 6 वाजे पर्यंत 24 तासात नोंदविण्यात आला आहे. तर, पुर्व उपनगरात भांडूप येथे 112 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा येथे 22.2 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला आहे. मुंबईत मंगळवारी रात्री पासूनच पावसाने चांगला जोर धरला होता. दुपारी उपनगरातील अनेक भागात जोरदार पावसासह सोसाटयाचा वाराही वाहत होता.काही वेळा वाऱ्याचा वेगही ताशी 50 किलोमिटर वेगा पर्यंत पोहचला होता. पवई येथे 105.2,लोखंडवाला अंधेरी येथे 138.6,मालाड 122.6 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला आहे.

ठाण्यातील गणेशविसर्जनाबाबतही आल्या महत्वपुर्ण सूचना; ठाणेकरांना बुक करावा लागेल ऑनलाईन स्लॉट

अरबी समुद्रात आणि घाट माध्यावर पावसाळी ढग जमा असल्याने पावसाचा जोर वाढला आहे.रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रविवार पर्यंत ही परीस्थीती राहाणार आहे.असे वेधशाळेकडून सांगण्यात आले.अंबर अलर्ट असल्याने नाविक दल,तटरक्षक दल राष्ट्रीय आपत्ती निवारण बल तसेच स्थानिक प्रशासनाला सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे.मुंबईत पुढील 48 तास जोरदार पावसासह वेगाने वारे वाहाण्याची शक्‍यता आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be careful! Big warning given to Mumbai, Thane Palghar by Meteorological Department; Amber alert issued in Raigad, Ratnagiri too