सावधान... मायोपिया बळावतोय! डोळे सांभाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मायोपिया
मायोपिया

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे शहरी भागात "मायोपिया' आजार बळावत चालला आहे. लहान वयातच मोबाईल किंवा गॅझेटचा वापर केल्याने डोळ्यांना जवळच्या वस्तू सहज दिसतात; परंतु दूरचे काहीच दिसत नाही. सध्या अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जीवनशैलीत बदल केल्यास हा आजार टाळता येणे शक्‍य असल्याचा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. 

"मायोपिया' एक दृष्टिदोष आहे. ज्यामध्ये डोळ्यांच्या सामान्य कार्यामध्ये दूरवरच्या वस्तूंमध्ये बदल दिसून येतात. मायोपिया असलेल्या व्यक्तीस सहसा जवळ असलेल्या चांगल्या वस्तू दिसतात; मात्र त्याच्यापासून अनेक मीटर अंतरावरील वस्तू पाहण्यात अडचण येते. डोळ्यांचे स्नायू कमकुवत होण्यामुळेही मायोपिया होऊ शकतो. यासाठी स्नायूंना बळकट करण्यासाठी शारीरिक व्यायाम हा उत्तम पर्याय आहे.

एखाद्याच्या डोळ्याच्या आकारामुळे हलकी किरणे चुकीच्या पद्धतीने वाकणे आणि आपल्या डोळ्यातील पडद्यात दोष निर्माण झाल्यास समोरील वस्तू न दिसण्याची समस्या उद्‌भवू शकते. याशिवाय सतत कॉम्प्युटरवर काम करत राहिल्यावरही धूसर दिसायला लागते. शहरी भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही समस्या चिंताजनक बनली आहे. 

लक्षणे 
- प्रौढांमध्ये अंधुक दिसणे, डोकेदुखी आणि रात्री वस्तू पाहण्यात अडचणी 
- मुलांमध्ये सतत डोळे मिचकावणे, वारंवार डोळे चोळणे 
- वेळीच उपचार न केल्यास रेटिना डिटेचमेंट, मोतीबिंदू, काचबिंदू होऊ शकतो
 

आजार टाळण्यासाठी 
- जीवनशैलीत बदल आवश्‍यक 
- मोठ्यांसह लहान मुलांनी गॅझेटचा वापर कमी करावा 
- नियमित व्यायाम करणे गरजेचे. 
- नेत्र तपासणी करणे आवश्‍यक

कॉर्नियातील बिघाड, औद्योगिकीकरण, इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटचा वाढता वापर, अनुवंशिकता, घरामध्ये बसून तासन्‌तास लॅपटॉपवर काम करणे अशा विविध कारणांमुळे शहरी भागातील लोकांमध्ये मायोपिया हा डोळ्यांशी संबंधित आजार वाढतोय. सध्या लॉकडाऊनमुळे कार्यालयीन काम आणि शाळेचा अभ्यास करण्यासाठी लॅपटॉप, मोबाईलचा वापर वाढला आहे. मायोपिकाचे रुग्ण वाढण्यामागील हे मुख्य कारण आहे. 100 पैकी चार जणांना शारीरिक कारणांमुळे मायोपिया होतो, तर 100 पैकी 12 जणांना जीवनशैलीशी संबंधित चुकीच्या पद्धतीमुळे हा आजार होतो. 
- डॉ. हेमंत तोडकर, नेत्रतज्ज्ञ 

(संपादन- बापू सावंत)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com