
अलिबाग : पर्यटकांच्या गर्दीने नेहमी गदबजणारे कोकणातील समुद्र किनारे लॉकडाऊनमध्ये सुनेसुने झाले आहेत. प्रसिद्ध अलिबाग समुद्र किनाऱ्यावर मागील 21 दिवसात एकही पर्यटक फिरकलेला नाही. यामुळे समुद्र किनाऱ्यांवर कमालीची शांतता आहे.
मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कुठेही पर्यटकांची आरडा-ओरड नाही, की कुठेही दुकानदारांची बडबड नाही. सगळीकडे पसरलेल्या भयाण शांततेत हजारो व्यवसायीकांचा पोटापाण्याचा मार्ग देखील थंडावला आहे. शिमगोत्सव सुरु होताच बहरत जाणाऱ्या पर्यटन उद्योगाला यावर्षी मोठा फटका बसला आहे. मार्च, एप्रिल महिन्यात परीक्षांचा कालावधी संपलेला असतो. याच कालावधीत पर्यटनासाठी जास्तीत जास्त लोक कुटुंबासह बाहेर पडलेले असतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे पर्यटक बाहेर पडु शकले नाहीत. अलिबाग समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांना अटकाव करण्यासाठी 22 मार्चला बॅरिगेट्स टाकून प्रवेश बंद करण्यात आला होता. हे बॅरीगेट्स बाजूला सारुन समुद्र किनारी एकही पर्यटक आला नसल्याचे अलिबाग नगरपालिकेच्या जीवनरक्षक दलाचे कुणाल सारंग यांनी सांगितले.
मार्च, एप्रिलमधील पर्यटन हंगामात अलिबाग समुद्र किनारी दर दिवसाला सरासरी हजार ते दीड हजार पर्यटक येतात. अशाच प्रकारे मांडवा,
किहीम, वरसोली, नागाव, आक्षी, काशीद, दिवेआगर, मुरुड या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी असते. यांच्यातून करोडो रुपयांची
उलाढाल होते. कोरोनामुळे ही उलाढाल झटक्यात शुन्यावर आली असल्याचे म्हणणे सारंग यांनी सांगितले.
*
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.