दोन पत्नींच्या मारहाणीत  मद्यपी पतीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

मद्यपी पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून दोन पत्नींनी त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी गोरेगाव येथे घडली.

मुंबई : मद्यपी पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून दोन पत्नींनी त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी गोरेगाव येथे घडली. याप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी सरिता आणि सविता वाघमारे या महिलांना अटक केली आहे. 

गोरेगाव लिंक रोड येथील शहीद भगतसिंग नगर येथे राहणारा राजू ऊर्फ भीमराव वाघमारे याचे दोन विवाह झाले होते. दारूचे व्यसन असलेला वाघमारे नेहमीच सरिता आणि सविता या दोघींना मारहाण करायचा. रोजच्या मारहाणीला त्या कंटाळल्या होत्या. तो गुरुवारी दुपारी दारू पिऊन घरी आल्यावर सरिता आणि सविता यांना मारहाण करू लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या दोन्ही पत्नींनी त्याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण सुरू केली.

स्थानिकांनी या घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली आहे. 

web title : In the beating of two wives The death of an alcoholic husband


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the beating of two wives The death of an alcoholic husband