दहा-पंधरा दिवस उलटले तरी ही कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत. सध्याच्या घडीला तर ते काम बंदच असून हे कधी पूर्ण केले जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
डोंबिवली : डोंबिवली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारुढ पुतळा उभा राहिल्याने शहराच्या वैभवात भर पडली आहे. मात्र, पुतळ्याच्या बाजूला असलेले अपुरे काम या चौकाची शोभा घालवत आहे. उपमुख्यमंत्री येणार म्हणून घाईघाईत चौकाचे काम तर झाले, मात्र रस्त्याच्या तिन्ही मार्गावरील डिव्हायडर सुशोभिकरण अद्याप अपुरे आहे. झाडांची रोपे, मातीचे ढिगारे गेल्या दहा-बारा दिवसांपासून येथे पडून असून हे काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.