esakal | मुंबईत कोविडमुळे मुस्लिम दफनभुमीत जागा अपुरी पडतेय
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोविडमुळे मुस्लिम दफनभुमीत जागा अपुरी पडतेय

मुंबईत कोविडमुळे मुस्लिम दफनभुमीत जागा अपुरी पडतेय

sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोविडमुळे (covid) मुस्लिम दफनभुमीत (muslim burial ground)जागा अपुरी पडू लागली आहे. महत्वाच्या दफनभुमींमध्ये जागेच्या टंचाईचा मुद्दा पुढे येऊ लागला आहे. त्यामुळे आता मुस्लिम समाजाकडून दफन करण्यासाठी अतिरीक्त जागेची मागणी केली जात आहे. या मागणीची दखल घेऊन महापालिका आयुक्त (bmc) इक्बाल सिंह चहल यांनी उपायुक्तांना तत्काळ बैठक घेऊन तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. (Because of covid muslim community facing shortage of burial ground)

मृतदेह दफन केल्यानंतर त्याचे विघटन होण्यास काही महिन्यांचा कालावधी लागतो. तसेच,कोविड बाधीत मृतदेह फार लांबच्या दफनभुमित घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक दफनभुमींमध्ये जागेची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. भायखळ्यातील नारियलवाडी कब्रस्तान, खोजा कब्रस्तान, बडा कब्रस्तान, वर्सोवा कब्रस्तान या ठिकाणी ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते आमदार रईस शेख यांनी ही समस्या महानगर पालिका आयुक्त चहल यांच्या लक्षात आणून दिली आहे.

हेही वाचा: मुंबईत लसीकरणाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडतेय एक मोठी गोष्ट

याबाबत शेख यांनी आयुक्तांना पत्रही दिले आहे.यासाठी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींशी बैठक बोलवून तत्काळ तोडगा काढण्याची मागणी त्यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केली होती.या पत्राची दखल घेऊन आयुक्तांनी आरोग्य विभागाचे उपायुक्त देवीदास क्षिरसागर यांना तत्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत महानगर पालिकेच्या 21 आणि खासगी 49 मुस्लिम दफनभुमी आहेत.