"माझ्यामुळं इतर लोकांना पुण्य मिळतंय"; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला

आम्ही अशाच ठिकाणी जातो जिथं कॅमेरा घेऊन जाता येतं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSakal
Updated on

मुंबई : माझ्यामुळं इतर लोकांना आणि टिकाकारांना पुण्य मिळतंय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. गणेशोत्सव काळात विविध नेत्यांच्या घरी जाऊन गणेशाचं दर्शन घेण्याचा धडाका मुख्यमंत्र्यांनी लावला होता. त्यामुळं ते टीकेचे धनी झाले होते. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे येथील टेंभीनाका परिसरातील जय माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आज मंडप पूजनाचा सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Because of me other people get virtue Eknath Shinde speaks on Uddhav Thackeray)

CM Eknath Shinde
उद्धव ठाकरे, आनंद दिघेंच्या फोटोची चर्चा; अलका चौकात झळकला बॅनर

CM शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून गणेश मंडळांना दिलेल्या माझ्या भेटींनी सगळीकडे मोठा उत्साह होता. मी गणपतींचे दर्शन घ्यायला फिरायला लागल्यापासून अनेक लोक फिरायला लागले आहेत. त्यामुळं त्यांना पुण्य देखील माझ्यामुळंचं मिळतंय ते त्यांनी घ्यावं. ही आपली संस्कृती, परंपरा आहे. लोक माझ्यासोबत फोटो काढतात आणि ते व्हायरलं करतात. माझ्याकडे कॅमेरा नसतो पण लोकचं ते व्हायरलं करतात. आम्ही अशाच ठिकाणी जातो जिथं कॅमेरा घेऊन जाऊ शकतो.

CM Eknath Shinde
नुपूर शर्माला दिलासा! सुप्रीम कोर्टानं अटकेच्या आदेशाची मागणी याचिका फेटाळली

मी पुण्यात, मुंबईत, ठाण्यात आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. त्यांना वाटत होतं की, हा आपल्यातलाच मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळं ते त्या भावनेनं फोटो काढायला येतात. फोटो काढायला लोक का येतात कारण त्यांना त्याच्याजवळ जावंस वाटतं बाकीच्यांकडे का जात नाहीत हे माहिती नाही. प्रेमानं लोक येतात जसं मुख्यमंत्री व्हायच्या आधी एकनाथ शिंदे होता तसाच तो मुख्यमंत्री झाल्यानंतरही आहे, या आपलेपणाच्या भावनेनं लोक येतात. आणि आपुलकीनं फोटो काढून घेतात. म्हणून मला त्यात काही गैर वाटत नाही. त्यामुळं टीकाकारांना लोकांच्या प्रतिसादातूनच उत्तरं मिळतात, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना तसेच उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com