वेशीवर घडतंय असं काही...; नवी मुंबईकर झालेत त्रस्त!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

नवी मुंबई व ठाण्याच्या वेशीवरील ठाणे महापालिका हद्दीतील भोलानगर या परिसरातील रहिवासी कचरा आणून टाकतात. या कचऱ्यामुळे नवी मुंबईच्या प्रतिमेला डागाळत आहे. 

वाशी : नवी मुंबई व ठाण्याच्या वेशीवरील ठाणे महापालिका हद्दीतील भोलानगर या परिसरातील रहिवासी कचरा आणून टाकतात. या कचऱ्यामुळे नवी मुंबईच्या प्रतिमेला डागाळत आहे. 

ही बातमी वाचली का?...भ्रष्टाचाराची कीड 'इथेही'; एसीबी चौकशीची मागणी

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात देशात प्रथम क्रमांक येण्यासाठी कंबर कसली आहे; मात्र नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील आनंदनगर या परिसराच्या बाजूलाच लागून ठाणे महापालिकेचा प्रभाग क्रमांक 24 आहे. प्रभाग क्रमांक 24 मधील भोलानगर या परिसरातील रहिवासी दोन्ही शहरांच्या वेशीवर कचरा आणून टाकतात; तर ठाणे महापालिकादेखील या प्रभागाकडे दुर्लक्ष करत असून, वेळेत कचरा उचलत नाही. त्यामुळे येथे नेहमीच कचरा पडलेला पाहायला मिळतो. वेशीवर नियमित कचरा पडत असतानादेखील ठाणे महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचा नवी मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप होत आहे. नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक 1 स्वच्छ करत असताना ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 च्या कचऱ्यामुळे स्वच्छ नवी मुंबईच्या प्रतिमेला डाग लागत आहे. 

ही बातमी वाचली का? रस्ता सुरक्षेबाबत बेकायदा फलकबाजी

कचऱ्याचे ढीग 
नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सागितले, की ठाणे महापालिकेने त्याच्या हद्दीतील कचरा उचलणे अनिवार्य आहे; मात्र ते कचरा वेळेत उचलत नाहीत. त्यामुळे तिथे कचऱ्याचे ढीग लागतात. नवी मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला यासदंर्भात माहितीदेखील देण्यात आली आहे; मात्र त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Because of the waste Citizens in Navi Mumbai suffer