Balasaheb Thackrey : बाळासाहेबचं ते! नरेंद्र मोदींचा बाळासाहेब ठाकरेंना वाकून नमस्कार

दौऱ्याआधी झळकले बाळासाहेबांसमोर वाकून नमस्कार करतानाचे पोस्टर
Balasaheb Thackrey
Balasaheb ThackreyEsakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही विकास कामांचं लोकार्पणही करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईत बीकेसी मैदानावर मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सभेमध्ये मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.

मुंबईत या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुंबईत शिंदे गट आणि भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे यांचे मोठमोठे बॅनर्स आणि कटआऊट्स लावण्यात आले आहेत. संपूर्ण मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर्स आणि कटआऊट्सने झळकली असून गोरेगाव मध्ये थोडे वेगळ्या स्वरूपाचे बॅनर झळकले आहेत.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

Poster
Poster Esakal

गिरगावात बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हात हातात घेऊन त्यांना वाकून नमस्कार करताना दिसून येत आहेत. या पोस्टरमुळे राजकीय चर्चा रंगू लागली आहे. या पोस्टरनंतर बाळसाहेबांसमोर सगळे झुकले अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Balasaheb Thackrey
Kasba Peth Bypoll Election : कसबा बिनविरोध नाहीच! पोटनिवडणुकीसाठी काँग्रेससह, राष्ट्रवादीही रिंगणात?

दरम्यान हे पोस्टर गिरगावात कोणी लावले हे समजू शकलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्याचा पोस्टर लावण्यात आला आहे अगदी त्या शेजारी हा पोस्टर लावण्यात आला आहे.

Balasaheb Thackrey
Koregaon Bhima प्रकरणी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची चौकशी होणार

या बॅनर्सवर कोणताही मजकूर लिहिलेला नाही. तसेच या बॅनर्सवर फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. बाळासाहेब ह्यात असताना मोदी मातोश्रीवर आले होते. त्यावेळी त्यांनी मान झुकवून बाळासाहेबांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. तोच फोटो या बॅनर्सवर लावण्यात आला आहे. त्यावर काही लिहिलेलं नसलं तरी भाजपला यामधून टोला लगावण्यात आला आहे.

हे बॅनर्स कोणी लावले त्याची माहिती नाही. बॅनर्सवर कुणाचंही नाव नाही. कोणत्याही पक्षाचं नाव नाही. कोणत्याही संघटनेचं नाव नाही. अज्ञात व्यक्तीने हे बॅनर्स लावलं आहे. व्यक्ती अज्ञात असला तरी भाजपला डिवचण्यासाठीच हे बॅनर्स लावण्यात आल्याचीही चर्चा रंगली आहे. मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या बॅनर्सची जोरदार चर्चा रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com