esakal | तिसऱ्या लाटेपूर्वी मुंबईत ६० लाख नागरीकांचं लसीकरण पूर्ण होणं गरजेचं
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Life

मुंबईत ६० लाख नागरीकांचं लसीकरण पूर्ण होणं गरजेचं

sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोविडच्या तिसऱ्या लाटेपूर्वी (thied wave) मुंबईतील ६० लाख नागरीकांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र,आतापर्यंत १३ टक्के नागरीकांचे लसीकरण (vaccination) पूर्ण झाले आहे, तर15 लाखाहून अधिक नागरीकांना (citizen) अद्याप लशीचा एकही डोस मिळालेला नाही. मुंबईसह देशात 18 जानेवारी पासून लसीकरण सुरु झाले आहे. (Before third wave its is necessary to complete 60 lakh people vaccination in mumbai)

महानगर पालिकेने प्रसिध्द केलेल्या आकडेवारी नुसार आता पर्यंत 35 लाख 85 हजार 210 नागरीकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर, अपेक्षित 60 लाख नागरीकांपैकी 8 लाख 77 हजार 577 नागरीकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. म्हणजे 13 टक्के नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, 15 लाख 37 हजार नागरीकांना अद्याप एकही डोस मिळालेला नाही.

हेही वाचा: BMC मुंबई लोकल सेवेबाबत गुरुवारपर्यंत घेणार निर्णय

केंद्र सरकारने आज पासून 18 वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र,लशींचा आवश्‍यक साठा नसल्याने मुंबईसह राज्यात 30 वर्षावरील नागरीकांचे लसीकरण होणार आहे. तर,हे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मुंबईत 18 ते 29 या वयोगटातील नागरीकांचे लसीकरण सुरु होणार आहे.

हेही वाचा: BMC मुंबई लोकल सेवेबाबत गुरुवारपर्यंत घेणार निर्णय

44 वर्षा पर्यंत 40 लाख नागरीक

मुंबईत 18 ते 44 या वयोगटात 40 लाख नागरीक आहेत.18 ते 44 या वयोगटातील 21 लाख 41 हजार नागरीकांनी आता पर्यंत कोविड लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर, 24 हजार 512 नागरीकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे तब्बल 18 लाख 82 हजाराहून अधिक नागरीकांपर्यंत कोविडची लस पोहचविण्याचे आव्हान महानगर पालिकेपुढे आहे

लसीकरण का होतय संथ

आवश्‍यक लस साठा उपलब्ध नाही.

कोविड ऍप मध्ये नोंदणी करण्यात अडथळे,संगणक साक्षरता अपुरी.

लशीच्या किरकोळ साईड इफेक्‍टच्या भितीने कामगार वर्गाकडून अपुरा प्रतिसाद.

लस खरेदीसाठी प्रतिसाद न मिळाल्याने साठा उपलब्ध होऊ शकला नाही.

खासगी रुग्णालयाचे दर न परवडणारे.

महानगर पालिका काय करणार

- लसीकरणाच्या नोंदणीसाठी सामाजिक संस्थांची मदत घेणार.

- लशींचा साठा वाढू लागल्यावर केंद्रांची संख्या वाढविणार.

- विविध क्षेत्रातील कामागारांचे प्राधान्यांने लसीकरण.

loading image
go to top