बेस्टची कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई, 'इतक्या' कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ

बेस्टची कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई, 'इतक्या' कर्मचाऱ्यांना केलं बडतर्फ

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमानं घातलं. गेल्या चार ते पाच महिन्यापासून कोरोना व्हायरस मुंबईत तळ ठोकून आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा पुरवल्या जात होत्या. त्यावेळी अत्यावश्यक सेवांमध्ये बेस्ट बसनं नागरिकांसाठी सेवा पुरवली. मात्र लॉकडाऊनच्या काळात गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरुच ठेवली आहे.  कारवाईचा हा आकडा वाढत आहे. आतापर्यंत १५९ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. 

लॉकडाऊनच्या काळात ही बेस्ट उपक्रमानं परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थितीच्या सूचना केल्या होत्या. तर विद्युत विभागासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी १५ टक्केच उपस्थिती होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा देताना लॉकडाऊनच्या काळात बेस्ट कर्मचाऱ्यांची उपस्थिती गरजेची होती. मात्र या वेळात अनेक कर्मचारी गैरहजर राहिले.

तसंच मनुष्यबळाअभावी काही कर्मचाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागला. त्यामुळे बेस्टनं गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना चार्जशीट देऊन कामावर हजर राहण्याच्या सूचनाही केल्या. मात्र सूचना देऊनही हे कर्मचारी कामावर हजर राहिले नाही. त्यामुळे कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत वाढ झाली असून, आता संख्या १५९ झाल्याचे समजतं. यामध्ये परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून त्यापाठोपाठ अन्य विभागातील कर्मचारी आहेत. 

गेल्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बेस्टमधील ११२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या कारवाईत या महिन्यात वाढ झाली आहे. जे कर्मचारी चार्जशीट दिल्यानंतर कर्तव्यावर परतले त्यांच्यावर वेतनवाढ रोखण्याचीही लवकरच कारवाई होणार आहे.

best 159 employees dismissed from services they absent in lockdown period

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com