

Mumbai BEST Bus Service
ESakal
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्टने प्रवाशांसाठी जादा बसगाड्यांची सोय केली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री गेट वे ऑफ इंडिया, जुहू, गोराई आणि मार्वे चौपाटी या भागांत जाणाऱ्यांसाठी २५ अतिरिक्त बसफेऱ्या चालवण्यात येणार आहेत. रात्री १० ते साडेबारापर्यंत विशेष बस गाड्या धावणार आहेत. रात्री १० पासून ते १२.३० वाजेपर्यंत अतिरिक्त बसेस उपलब्ध असतील.