

BEST Bus Ticket
Esakal
मुंबई : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने (बेस्ट) आपल्या प्रवाशांना डिजिटल युगाची नवी भेट दिली आहे. बेस्ट उपक्रमाने आता आपले तिकीट बुकिंग ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ (ओएनडीसी) प्लॅटफॉर्मशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना बेस्टचे तिकीट काढण्यासाठी वेगळे बेस्ट ॲप डाऊनलोड करण्याची गरज उरणार नाही.