बेस्ट बस चालकाला हृदयविकाराचा झटका; बसची भाजी मंडईला धडक

समीर सुर्वे
Tuesday, 20 October 2020

चेंबूर पोलिस स्टेशन समोरीलबसंत पार्क येथे ही दुर्घटना घडली.

मुंबई - चेंबूर वरुन घाटकोपरला येणाऱ्या 381 क्रमांकाच्या बेस्ट बसचे चालक हरिदास पाटील यांना ह्रद्यविकाराचा झटका आला. चेंबूर पोलिस स्टेशन समोरीलबसंत पार्क येथे ही दुर्घटना घडली. हरिदास पाटील यांचा बस वरील ताबा सुटल्याने बस भाजीच्या दुकानात घुसली.सुदैवाने कोणी जखमी नाही. पाटील यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आता सर्वांनाच लोकलनं प्रवास करण्याची परवानगी द्याः मुंबई उच्च न्यायालय

घाटकोपर ते माहुल मार्ग जाणारी बस चेंबूर बसंत पोलीस ठाणे समोर आली असता अचानक बसचालकाला हृदयविकाराचा झटका आला.  घाटकोपर मार्ग माहुल कडे जाणारी बस क्रमांक 381 सकाळी ठीक. 11वाजण्याच्या सुमारास चेंबूर पोलीस ठाणे समोर आली असता अचानक बस चालक हरिदास पाटील यांच्या छातीत दुखायला लागले त्यांनी बस वरील नियंत्रण राखत बस बाजूला घेतली परंतु बस सिग्नल धडकली. चालकाने प्रसंगांधानता राखल्याने प्रवाशांचे प्राण वाचले आहे.

मुंबईसह पालघरमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

बाजूला भाजीविक्रेता होता. त्याला गाडी अचानक अंगावर येत असल्याचे बघून त्याने सावधानता बाळगत पळ काढला.
या बस मध्ये एकूण 9 प्रवासी होते. यापैकी कोणाही जखमी झालेले नाही. मात्र पोलिसांनी धाव घेऊन चालकाला उपचाराकरिता राजावाडी रुग्णालयात दाखल  केले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Best bus driver heart attack The bus hit the vegetable market