

BEST Bus Report
esakal
मुंबई: बेस्टच्या ताफ्यात धावणाऱ्या कंत्राटी बसच्या वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवली. या तपासणीत ताफ्यातील तब्बल ७७४ कंत्राटी बसच्या ब्रेक प्रणाली आणि स्टिअरिंग यंत्रणेत गंभीर तांत्रिक दोष आढळून आले आहेत. याशिवाय ९४ बस दुरु स्तीच्या टप्प्यात असूनही या दोषयुक्त ८६८ बसेस रस्त्यावर धावत असल्याचा आरोप बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी मंगळवारी (ता. २१) केला.