Mumbai Best Bus service at Night | 'बेस्ट'च! आजपासून मुंबईत २४ तास बससेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray Tweet on Best 24 hour service
मुंबईकरांना बेस्टमधून रात्रीही करता येणार प्रवास; आजपासून चोवीस तास सेवा | Best Bus service at Night

'बेस्ट'च! आजपासून मुंबईत २४ तास बससेवा

(Mumbai to have 24/7 best bus service) देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये बेस्टद्वारे आजपासून चोवीस तास सेवा दिली जाणार आहे. मध्यरात्रीपासून ते पहाटे 5 पर्यंत मुंबईतील 6 मार्गावर बेस्ट बस धावणार आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या मुंबईकरांसाठी सुरक्षित आणि स्वस्त सार्वजनिक सेवा देण्याचा प्रयत्न बेस्टमार्फत (Best) केला जाणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली.

"24/7 कार्यरत असलेले शहर मुंबईमध्ये आता 24/7 बस सेवा असणार आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणार्‍या मुंबईकरांसाठी सुरक्षित आणि कदाचित जगातील सर्वात स्वस्त सार्वजनिक वाहतूक बस सेवेपैकी एक असलेली बेस्ट रात्रीच्या बसेस सुरू करत आहे", असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: मुंबईतील प्रत्येक वॉर्डात श्वानासाठी उद्यान : आदित्य ठाकरे

मुंबई हे चोवीस तास कार्यरत असणारं शहर आहे. बेस्ट ही मुंबईतील प्रमुख सार्वजनिक व्यवस्था. मात्र रात्रीच्या वेळी बेस्टची सेवा बंद असते. त्यामुळे उशिरापर्यंत काम करणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होते. तसेच त्यांना वाहतुकीसाठी इतर महागडे पर्याय शोधावे लागतात. त्यामुळे बेस्टने मध्यरात्रीपासून ते पहाटे 5 पर्यंत विविध सहा मार्गांवर बेस्टतर्फे रात्रीही मुंबईकरांना सेवा दिली जाणार आहे.

हेही वाचा: आदित्य ठाकरे उत्तरप्रदेशात प्रचाराला

या सहा मार्गांवर धावणार बस

१. इलेक्ट्रीक हाऊस, कुलाबा ते माहिम बसस्टँड (रुट क्रमांक 1)

२. इलेक्ट्रीक हाऊस ते शीव (Sion), (रुट क्रमांक 66)

३. माहिम बस स्टँड ते पोईसर डेपो, (रुट क्रमांक 202)

४. शीव ते मुलुंड पश्चिम, (रुट क्रमांक 302)

५. बॅकबे डेपो ते शीव (रुट क्रमांक 305)

६. माहिम ते बोरीवली (लिमिटेड, रुट क्रमांक ४४०). या मार्गावरील बस दोन्ही एअरपोर्टमार्गे जातील.

Web Title: Best Buses Will Give Twenty Four Hour Service From Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top