esakal | मुंबईत बस मार्ग बदलल्याने प्रवाशांची झाली कोंडी; बेस्ट उपक्रमामुळे गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai best

मुंबईत बस मार्ग बदलल्याने प्रवाशांची झाली कोंडी; बेस्ट उपक्रमामुळे गोंधळ

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : बेस्ट उपक्रमाने (BEST) बसच्या मार्गात केलेल्या बदलांमुळे (Changes in Way) प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ (commuters confusion) उडाला आहे. लोकल प्रवास मर्यादित असल्याने (Train Traveling) अद्याप नोकरदारांना बेस्टचाच आधार आहे. मात्र, लांब पल्याचे मार्ग कमी करण्यात आल्याने तसेच काही मार्ग वळविण्यात आल्याने प्रवशांची आज कोंडी झाली होती. मुंबई (Mumbai) भरात हे चित्र आज पाहायला मिळत होते.

हेही वाचा: राज्याची 500 कोटींची एसटीला मदत; कर्मचाऱ्यांना मिळणार जुलै महिन्याचे वेतन

पुर्व द्रुतगती मार्गावरुन मुलूंड ते शिवडी अशी 368 क्रमाकांची बस आणि पश्‍चिमेकडून गेली.त्यामुळे पुर्व द्रुतगती मार्गावरील बराच वेळ ताटकळत राहावे लागते.नंतर त्यांना पर्यायी बस मधून प्रवास करावा लागला.तशीच तऱ्हा वरळी ते मुलूंड पर्यंत धावणाऱ्या 27 क्रमांकाच्या बसची झाली.हा मार्गही बदलण्यात आल्याची माहिती न मिळाल्याने प्रवाशांचे हाल झाले. दक्षिण मुंबईतील ८३, ८४ हे मार्ग बंद केल्याने प्रवाशांकडे कोणताच पर्याय राहिलेला नाही.

६६क्रमांकाच्या मार्गातही बदल केल्याने प्रवाशांना मधल्याच थांब्यावर उतरुन पायी चालत जावे लागत आहे. बेस्टने कॉरिडॉर सी बसमार्गाची पुर्नरचना केली असून काही मार्गावरील बस थेट उड्डाणपुलांवरुन नेण्यास सुरुवात केल्याने पुलाखालील बसथांब्यावरील प्रवाशांचे हाल हाेउ लागले आहेत. ७ आणि २२ मर्यादित हे जे. जे. उड्डाणपुलाखालून जाणारे बसमार्ग बंद केले आहेत. परिणामी, इथून कुर्ला, विक्रोळी, मरोळ येथे जाणाऱ्या प्रवाशांना अन्य पर्याय उपलब्ध नाहीत.

फेऱ्यांमध्ये कपात

४८४ मार्गांवर बस चालविल्या जात असताना आता कपात करुन ४१९ बसमार्ग केले आहेत. वेळापत्रकात बदल केला असून 15 नवे बसमार्ग, सहा बसमार्गांचा विस्तार, 45 बसमार्ग रद्द केलेत. प्रवाशांचा प्रतिसाद आदी घटक लक्षात घेऊन बदल केल्याचे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे.

loading image
go to top