लवकरच मुंबईकरांच्या सेवेसाठी बेस्टच्या अत्याधुनिक डबल डेकर बसेस

समीर सुर्वे
Monday, 16 November 2020

बेस्टच्याा ताफ्यात नव्या 100 डबल डेकर बसेस दाखल होणार आहे. या नव्या डबल डेकर बसेसमध्ये दोन स्वयंचलित दरवाजे असणार असून या बसेस विना वातानुकूलीत असतील.

मुंबई: बेस्टच्याा ताफ्यात नव्या 100 डबल डेकर बसेस दाखल होणार आहे. या नव्या डबल डेकर बसेसमध्ये दोन स्वयंचलित दरवाजे असणार असून या बसेस विना वातानुकूलीत असतील. बेस्ट प्रशासनाने बेस्ट उपक्रमातील जुन्या आणि वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या डबल डेकर बसेस मार्च 2021 पर्यंत भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे.  त्याबदल्यात 100 नव्या डबल डेकर बसेस रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यासाठीच्या निविदा लवकरच काढल्या जाणार असल्याचंही बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

बेस्टच्या ताफ्यात 122 डबेल डेकर बसेस आहे.अशा प्रकारच्या बसेस फक्त लंडन आणि मुंबईच्या रस्त्यावर धावतात. प्रवासी नसल्याने बेस्टने डबल डेकर बसेसचा ताफा कमी केला आहे. मात्र,आता लवकरचं 100 बसेस खरेदी करण्यात येणारेय.

अधिक वाचा-  धारावीतून दिलासादायक बातमी, केवळ एका रुग्णाची भर

या बसेसला दोन स्वयंचलित दरवाजे, दोन जिने,  सीसीटीव्ही यंत्रणा असेल. तसेच वाहकांना एकमेकांशी बोलण्याची यंत्रणाही असेल. नव्या बसेसचे दरवाजे स्वंयचलित राहणार आहेत.  सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचीही खबरदारी घेण्यात आली आहे. सध्याच्या डबल डेकर बसेसला एकच दरवाजा आणि जिना आहे.  या अत्याधुनिक यंत्रणांसह बेस्ट बसेसची ओखळ असलेला भोंपू हॉर्नही असणारेय. 1937 ला पहिली डबल डेकर बस मुंबईच्या रस्त्यावर धावली होती.

अधिक वाचा-  मुंबईत रस्ते अपघातात गरोदर मादी बिबट्याचा मृत्यू

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BEST Decision put 100 double decker buses serve Mumbaikars soon


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BEST Decision put 100 double decker buses serve Mumbaikars soon