Prasad Lad: मुंबईतल्या बेस्ट कर्मचारी सहकारी क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीची यंदा भलतीच चर्चा झाली. त्याचं कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले. परंतु या निवडणुकीमध्ये प्रसाद लाड आणि शशांक राव ठाकरेंना वरचढ ठरले. ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही. ठाकरेंच्या या परभावामुळे तब्बल ९ वर्षांनी सोसायटीमध्ये सत्ताबदल झाला आहे.