बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विरोधीपक्षनेते मैदानात, भाजपचीही इमोशनल  खेळी 

समीर सुर्वे
Thursday, 1 October 2020

'बेस्ट' समितीमध्ये शिवसेना 8, भाजप 6, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे. तर सुधार समितीत शिवसेना 12, बीजेपी 10, काँग्रेस 2, राष्ट्रवादी आणि सपाचे प्रत्येकी 1 सदस्य आहेत.

मुंबई : बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा स्वतः मैदानात उतरले आहेत. रवी राजा यांनी आज बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी कॉग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महापालिकेच्या सुधार समितीसह बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी  6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले. रवी राजा यांनी कॉग्रेसकडून बेस्ट समितीसाठी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेकडून प्रवीण शिंदे आणि भाजपकडून प्रकाश गंगाधरे यांनी बेस्ट समितीच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सदानंद परब, भाजप कडून विनोद मिश्रा आणि कॉग्रेसकडून जावेद जूनेजा यांनी अर्ज दाखल केला आहे.

संख्याबळ 

'बेस्ट' समितीमध्ये शिवसेना 8, भाजप 6, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे. तर सुधार समितीत शिवसेना 12, बीजेपी 10, काँग्रेस 2, राष्ट्रवादी आणि सपाचे प्रत्येकी 1 सदस्य आहेत.

महत्त्वाची बातमी : २०१९ आधीचे कॉल डिटेल्स मिळणं कठीण, NCB च्या तपासात स्पीडब्रेकर येण्याची शक्यता

भाजपची इमोशनल  खेळी 

भाजपने आता अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले असले तरी ही निवडणुक आवाजी पध्दतीने होते. त्यात, भाजपने जर कॉग्रेसच्या उमेदरावाला मत दिले तर शिवसेनेवर नामुष्की ओढावू शकते. त्यामुळे शिवसेनेचे टेंशन वाढले आहे. त्यातच भाजपचे  नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी आता इमोशन खेळ खेळण्यास सुरवात केली आहे. वैधानिक समितीत अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेण्याची संभावना व हालचाली लक्षात घेता काॅग्रेस हा खरोखरीचा विरोध पक्ष आहे की शिवसेना पुरस्कृत विरोधी पक्ष आहे ?अशी शंका आमच्या मनात आहे.

( संकलन - सुमित बागुल )

best elections in mumbai opposition leader raja to contest election bjp is playing emotional card 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: best elections in mumbai opposition leader raja to contest election bjp is playing emotional card