

मुंबई : महापालिकेने बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंगळवारी पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतन करार, नैमित्तिक (कॅज्युअल) कामगारांची नोशनल (काल्पनिक) वेतन निश्चिती आणि वेट लीज कर्मचाऱ्यांना 'समान काम, समान वेतन' देण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्याची शिफारस करण्यात आली आहे. या निर्णयामुळे बेस्टच्या ३८ हजार २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.