आता मुंबईतील स्ट्रीट लाईट होणार शॉक फ्री, BEST प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय 

समीर सुर्वे
Tuesday, 27 October 2020

जमिनीपासून 10 फुटांपर्यंत विद्युतरोधक रंग लावण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई, ता.27 : शहरातील पथदिवेे आता शॉक फ्री होणार आहेत. जमिनीपासून 10 फुटांपर्यंत विद्युतरोधक रंग लावण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. याबाबतची माहिती बेस्टकडून महासभेत सादर करण्यात आली आहे.

उद्याने आणि झोपडपट्ट्यांच्या परीसरातील दिव्यांच्या खांबांवर हा रंग प्रायोगिक तत्वावर लावण्यात येणार आहे. त्याचा अभ्यास करुन शहरतील सर्व पथदिव्यांच्या खाब्यांवर रंग लावण्यात येईल. त्याचबरोबर पथदिव्यांना एक आर्थिंग केले जाते. तर आता दोन आर्थिंग केले जाणार आहे. तसेच विजवाहीन्याही लवकर खराब होणार नाही याची दक्षता घेऊन विशिष्ट प्रकारच्या वाहीन्या वापरण्यात येणार असल्याचे बेस्टने नमुद केले आहे. बेस्ट उपक्रमाअंतर्गत कुलाबा ते शिव, माहिमपर्यंत पथदिव्यांना विद्युत पुरवठा केला जातो.

महत्त्वाची बातमी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता; BMC कडून 50 हजार खाटांची तयारी 

स्ट्रीटलाईटमधील पथदिव्यांमधिल वीज वहन यंत्रणा सदोष असल्यास वीजेच्या लोखंडी खांबांमध्ये विजप्रवाह उतरतो आणि अशा खांबाच्या संपर्कात आल्यास कोणालाही विजेचा धक्का लागू शकतो. पावसाळ्यात पाणी साचलेल्या परीस्थितीत हा धोका अधिकच वाढतो. अशा  दुर्घटना टाळण्यासाठी विजेच्या खांबांभोवती विशिष्ट उंचीपर्यंत लाकडी आवरण बसवावे अशी ठरावाची सुचना राष्ट्वादी कॉग्रेसच्या  सईदा खान यांनी मांडली होती. त्यावर बेस्ट प्रशासनाकडून ही माहिती सादर करण्यात आली आहे.

 शहरातील गर्दी लक्षात घेऊन विजेच्या खांबांभोवती लाकडी आवरण करणे शक्य नसल्याचे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे विजेच्या खांबांना दहा फूट उंचीपर्यंत विद्युत रोधक रंग लावण्यात येईल असे बेस्टने नमुद केले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

BEST has decided to paint electric poles with shockproof paint to avoid leakage


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BEST has decided to paint electric poles with shockproof paint to avoid leakage