esakal | BMC च्या कॉस्ट कटिंगचा 'बेस्ट' उपक्रमाला फटका; अनुदानात 'इतक्या' कोटींची कपात शक्य?
sakal

बोलून बातमी शोधा

BMC च्या कॉस्ट कटिंगचा 'बेस्ट' उपक्रमाला फटका; अनुदानात 'इतक्या' कोटींची कपात शक्य?

बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून या वर्षात मिळणार्या अनुदानाला कात्री लागण्याची शक्यता आहे.1 हजार 500 कोटी पैकी आता 300 कोटी रुपयां पर्यंतची कपात होण्याची शक्यता आहे

BMC च्या कॉस्ट कटिंगचा 'बेस्ट' उपक्रमाला फटका; अनुदानात 'इतक्या' कोटींची कपात शक्य?

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून या वर्षात मिळणाऱ्या अनुदानाला कात्री लागण्याची शक्यता आहे. 1 हजार 500 कोटी पैकी आता 300 कोटी रुपयां पर्यंतची कपात होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन मुळे बेस्टचे उत्पन्न घटलेले असतानाच अनुदानही कमी झाल्याने बेस्ट पाय अधिकच खोलात जाण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनमध्येही 'शुभमंगल सावधान' जोरात; चार महिन्यांत 556 जोडपी विवाहबद्ध....

महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात बेस्टला 2 हजार 126 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यानंतर या आर्थिक वर्षात 1 हजार 500 कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद पालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून आता पर्यंत 500 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र, उर्वरीत 1 हजार कोटी एेवजी 700 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले.

राज्यात खासगी बसवाहतूक सुरु, मग एसटीची वाहतूक बंद का?

जूलै महिन्यापर्यंत पालिकेच्या उत्पन्नात 4 हजार कोटी पर्यंत तूट झाली आहे.यानुसार वर्षभरात 12 हजार कोटीी पर्यंत तुट होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पालिकेने कॉस्ट कटिंगचा आराखडा तयार करण्यास सुरुवात केली. त्यात सर्व विभागांच्या खर्चात कपात येणार असून त्यात बेस्टला देण्यात येणार्या अनुदानाचाही समावेश असल्याचेे एका अधिकार्याने सांगितले. बेस्टला दरवर्षी सुमारे 2 हजार कोटी पर्यंत तोटा होत आहे.त्यामुळे पालिकेने अनुदान देण्यास सुरवात केली होती.या अनुदानातून बेस्टने 300 मिनी  बसेस भाड्याने घेतले आहेत.त्याच बरोबर  

ठरलं तर! आम आदमी पार्टी लढवणार 'केडीएमसी' निवडणूक; प्रचार समिती जाहीर

बस वाहतूक प्रणालीची दर्जोन्नती करण्यासाठी तसेच हा निधी बेस्टवरील कर्जांची परतफेड करण्यासाठी, भाडेतत्त्वावरील नवीन बसेस घेण्यासाठी, वेतन करारान्वये येणारे आर्थिक दायित्व व दैनंदिन खर्च भागवण्यासाठी आणि बस कधी येणार हे प्रवाशांना सांगणारे आयटीएमएस प्रकल्प वापरण्यासाठी खर्च करावा, अशा सूचना अर्थसंकल्पात पालिका प्रशासनाने केल्या आहेत

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )