गर्दीत ताटकळत राहणाऱ्या मुंबईकर प्रवाशांना मोठा दिलासा, आता BEST धावणार पूर्ण क्षमतेने

मिलिंद तांबे
Saturday, 24 October 2020

बेस्ट प्रशासनाने 18 सप्टेंबर रोजी राज्य सरकारला पत्र लिहीले होते. प्रवाश्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन सर्व बसेस चालवण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती.

मुंबई : मुंबईत बेस्टला आपल्या पुर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे कोविड काळात बससाठी ताटकळत राहणाऱ्या मुंबईकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

बेस्ट प्रशासनाने 18 सप्टेंबर रोजी राज्य सरकारला पत्र लिहीले होते. प्रवाश्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन सर्व बसेस चालवण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. बेस्टच्या विनंती आज मंजूरी देण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे बेस्ट प्रशासन आणि प्रवाश्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

महत्त्वाची बातमी : जर्दा आहे सांगून बॅगेतून पाठवलं हशीश, हनीमुनसाठी गेलेलं दाम्पत्य आता कतारमध्ये खातंय जेलची हवा

अनलॉक नंतर मोठ्या प्रणाणावर लोकं कामनिमित्त घरातून बाहेर प़डत आहेत. मात्र बसची वारंवारता कमी असल्याने प्रवाश्यांना बससाठी ताटकळत पहावे लागत होते. यामुळे बस स्टॉपवर नेहमीच गर्दी घायला मिळत होती. शिवाय प्रवाश्यांचे तिन ते चार तास जवळच्या प्रवासासाठी खर्च होत होते. शिवाय बस देखील खचाखच भरून येत असल्याने प्रवाश्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावी लागत होता. यामुळे समाजिक ठेवता येत नसल्याने प्रवाश्यांना कोरोनाचा धोका देखील निर्माण झाला होता.   

राज्य सरकारने 23 ऑक्टोबर रोजी हा महत्वपूर्ण निर्ण घेतला आहे. मुंबईत रेल्वे नंतर बेस्टला दुस-या क्रमांकाची लाईफ लाईन म्हटले जाते. कोविडमुळे सध्या केवळ 2700 बसेस रस्त्यावर धावत आहेत. यातून साधारणता 3 ते 4 लाख प्रवाशी प्रवास करत होते. सर्व बेस्ट बसेसला परवानी देण्याची मागणी बेस्ट एम्लॉईज युनियनने देखील केली होती.  सरकारच्या या निर्णयामुळे आता सर्व बसेस रस्त्यावर उतरणार असून यामुळे प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी प्रतिक्रीया बेस्ट एम्लॉईजचे अध्यक्ष नितिन पाटील यांनी व्यक्त केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )   

best to resume their full service after approval of state government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: best to resume their full service after approval of state government