

BEST Bus Action On Mobile Phone Driving
ESakal
प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत बेस्टने मुंबईतील वेट-लीज बस चालकांविरोधात एक कठोर मोहीम सुरू केली आहे. केवळ १८ दिवसांच्या विशेष तपासणीत वाहन चालवताना मोबाईल फोन वापरताना पकडलेल्या २३ चालकांवर कारवाई करण्यात आली. आता साध्या वेशातील अधिकारी प्रवासी म्हणून बसमधून प्रवास करतील आणि चालकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतील.