व्हॉट्‌सॲप, फेसबुक वापरताना काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

लॉकडाऊनचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली आहेत. सध्या मॉंट ब्लॅंक नावाच्या बनावट संकेतस्थळाबाबत फसवणुकीच्या तक्रारी येत आहेत. त्यापासून सावध राहावे, असे आवाहन सायबर विभागाने केले आहेत. राज्यात आतापर्यंत 404 सायबर गुन्हे दाखल झाले असून 213 जणांना अटक करण्यात आली आहे. 

मुंबई : लॉकडाऊनचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली आहेत. सध्या मॉंट ब्लॅंक नावाच्या बनावट संकेतस्थळाबाबत फसवणुकीच्या तक्रारी येत आहेत. त्यापासून सावध राहावे, असे आवाहन सायबर विभागाने केले आहेत. राज्यात आतापर्यंत 404 सायबर गुन्हे दाखल झाले असून 213 जणांना अटक करण्यात आली आहे. 

ही बातमी वाचली का? अरे किती हिणवणार? भाजपच्या आंदोलनाची रोहित पवारांकडून खिल्ली

लॉकडाऊनच्या काळात सायबर भामटे खोटे संदेश व बनावट संकेतस्थळे बनवून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. मॉंट ब्लॅंक या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नावाने सध्या बरेच संदेश व पोस्ट व्हायरल होत आहेत. या कंपनीने आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर, विशेषतः शाईच्या पेनवर मोठी सवलत दिली आहे. नागरिकांनी या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच खरेदी करावी. कोणाकडूनही आलेल्या संदेशातील संकेतस्थळाच्या लिंकवर क्‍लिक करू नये, असे आवाहन राज्य सायबर विभागाने केले आहे. सायबर भामट्यांनी ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी बनावट संकेतस्थळे तयार केली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? लॉकडाऊन ४.० : मुंबईत आजपासून काय सुरु होणार?

समाजमाध्यमांच्या गैरवापराचे गुन्हे 

 • एकूण : 404 
 • अदखलपात्र : 20 
 • आक्षेपार्ह व्हॉट्‌सऍप संदेश फॉरवर्ड : 170 
 • आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्‌स शेअर : 161 
 • टिकटॉक व्हिडीओ पाठवणे : 18 
 • आक्षेपार्ह ट्‌विट : 7 
 • इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट : 4 
 • ध्वनिफिती, युट्यूबचा गैरवापर : 44 
 • अटक आरोपी : 213 
 • हटवलेल्या आक्षेपार्ह पोस्ट्‌स : 102 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware of fake websites! 404 cyber crimes filed during lockdown; 213 people arrested