मुलांच्या हातात मोबाईल किंवा टॅब देणाऱ्या पालकांनो 'ही' बातमी वाचा, जाणून घ्या महाभयंकर 'अम्ब्लोपिया' बद्दल

मुलांच्या हातात मोबाईल किंवा टॅब देणाऱ्या पालकांनो 'ही' बातमी वाचा, जाणून घ्या महाभयंकर 'अम्ब्लोपिया' बद्दल

मुंबई : लॉकडाऊनमध्ये मुलांची होणारी चिडचिड थांबवण्यासाठी पालक त्यांच्या हातात मोबईल, व्हीडीओगेम देतात. मात्र या सवयी आता लहान मुलांच्या जिवावर उठल्या आहेत. सतत मोबाईलवर गेम खेळणं, टँब हातात असणं, व्हीडीओ गेम खोळल्याने लहान मुलांमध्ये एक नविन आजार सुरू झाला आहे.हा आजार आहे अम्ब्लोपिया. म्हणजेच एक डोळा आळशी होणे. यामुळे पालकांनी वेळीच मुलांना आवार घातला नाही तर लहान मुलांचे डोळे निकामी होण्याची भीती आहे. लॉकडाऊनच्या काळात या याप्रकारच्या तक्रारी वाढल्या असल्याचे डॉक्टर सांगतात.

लॉकडाऊनमुळे मुलं सध्या घरीच आहेत. मुलांना बाहेर जाता येत नसल्याने मुलं काहीशी चि़डचिडी बनली आहेत. चिडलेल्या किंवा रडणा-या मुलांना शांत करण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल फोन देतात, नाहीतर अधिक वेळ टीव्ही पाहू देतात. यानंतर मुलं शांत होतात मात्र यामुळे मुलांचं शारीरिक नुकसान होतं.

मोबाईल असो किंवा मग टीव्ही मुलं तासंतास त्यावर आपला वेळ घालवतात. सातत्याने प्रकाश डोळ्यावर पडल्याने डोळ्यातील लहान बुबुळ छोटं होतं. त्यानंतर प्रकाश सहन न होऊन एका डोळ्याची क्षमता कमी होऊ लागते अशी माहीती नेत्ररोगतज्ज्ञ डॉ प्रशांत थोरात यांनी दिली. अशा वेळी डोळ्यातून नैसर्गिकरित्या येणारं पाणी बंद होऊन कृत्रिम रित्या पाणी येणे सुरू होते. शिवाय डोळ्यांच्याकडा देखील लाल होऊ लागतात. कालांतराने मुलांना होणारा त्रास वाढतो असंही डॉ.थोरात पुढे म्हणाले. लॉकडाऊनमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्या आहेत असंही ते पुढे म्हणालेत. 

मुलं मोबईलवर दोन ते चार तास सतत काहीना काही पाहत अतसतात. कालांतराने  मुलांना मोबाईलल किंवा व्हीडीओ गेमचं व्यसन लागतं, असं  बालरोग तज्ज्ञ डॉ. समीर दलवाई सांगतात. कालांकराने मुलांचा मोबाईल पाहण्याच कालावधी नकळत वाढत जातो. मात्र या सवईचा विपरीत परिणाम मुलांच्या डोळ्यांवर होतो. डोळ्यांची नजर कमी होऊ लागते. अशा मुलांना अम्ब्लोपिया हा आजार होतो. म्हणजे अतिरिक्त प्रकाश पडून डोळा खराब होतो आणि तो डोळा 80 टक्के निकामी होण्याचा धोका असल्याचे ही डॉ. दलवाई पुढे म्हणाले. डोळा निकामी झाला तर नंतर कधीही दुरूस्त होत नाही. शिवाय या मुलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स तयार होतो अशीही माहीती डॉक्टरांनी दिली.

मोबाईल-टिव्हीच्या अतिरेकाचे दुष्परिणाम

  • दृष्टिदोष निर्णाण होतो.
  • अम्ब्लोपियासारखे आजार बळावतात.
  • बसण्याची पद्धत बदलते.
  • पाठीला बाक येण्याची शक्यता होते 
  • मुलं हिंसक होतात , चिडचिडे होतात 

सध्या प्रत्येक घरात मोबाईल, टिव्ही, लँपटॉप, व्हीडीओ गेम मुलांना दिले जातात. मैदानी खेळांकडे मुलांचा ओढा कमी झालेला दिसतो. मात्र या इलेकट्रॉनिक वस्तूंच्या वापरामुळे अम्ब्लोपिया नावाचा आजार बळावतो आहे. हा आजार लहान मुलांच्या मुळावर उठला आहे. या आजाराला वेळीच आवर घातला नाही तर मात्र मुलांमध्ये डोळे गमावण्याची भिती आहे. त्यामुळे पालकांनी सावध होण्याची गरज असून याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज असल्याचेही डॉ. समीर दालवाई यांनी सांगितले. मोबाईल, त्यावरील गेम्स, व्हीडीओमुळे मुलांचे डोळे खराब होत चालले आहेत.आता यावर आवर घालण्यासाठी पालकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे

सोबतच पालकांनी याबाबत जागृत राहून मुलांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. मुलांना एखाद्या गोष्टीचं व्यसन लागू नये म्हणून काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचेही ते पुढे म्हणाले.

( संपादन - सुमित बागुल )

beware if you are giving mobiles and tabs to your kids amblyopia is dangerous

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com