सावधान मुंबईकर! दिवाळीनंतर हळूहळू कोविड रुग्णांमध्ये वाढ; औषध, टेस्टिंग, उपचारांसासाठी BMC सज्ज

सावधान मुंबईकर! दिवाळीनंतर हळूहळू कोविड रुग्णांमध्ये वाढ; औषध, टेस्टिंग, उपचारांसासाठी BMC सज्ज

मुंबई : मुंबईत दिवाळीनंतर हळूहळू कोविड रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली असुन चाचण्या वाढवल्यामुळे ही रुग्णसंख्या वाढलेली दिसून येत असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दिवाळी नंतर कोविड रुग्णसंख्या वाढली तर औषध, चाचण्या आणि उपचारांसासाठी पालिका सज्ज असल्याचे मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचे म्हणणे आहे. 

नवीन वर्षापूर्वी कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानूसार, पालिकेच्या अधिकार्यांनी तयारी सुरु केली असुन दिवाळीनंतरच्या वाढणार्या आकड्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्या आधारे नवीन वर्षाच्या उत्सवांना परवानगी दिली जाईल की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. 

शहरात दररोजच्या कोविड 19 प्रकरणांमध्ये घट झाली असली तरी मुंबई महानगरपालिकेने नवीन वर्षापूर्वीच दुसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्या आधारे, हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये नवीन वर्ष साजरे करण्यास परवानगी दिली जाईल की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. शिवाय, डिसेंबरमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाल्यास उत्सवांवर अनेक निर्बंध घातले जाऊ शकतात. दरम्यान, मुंबईसह राज्यात धार्मिक स्थळे ही सुरु झाली आहेत. त्यामुळे, या सर्व गोष्टींचा परिणाम रुग्णवाढीवर होणार आहे. 

दुसऱ्या लाटेसाठी पालिका सज्ज- 

दिवाळीनंतर किंवा नवीन वर्षापूर्वी कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी सर्व अधिकारी आणि यंत्रणा कामाला लागली आहे. मुंबईत आतापर्यंत संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या 17 लाख हून अधिक चाचण्या केल्या गेल्या आहेत. अँटी मास्क ड्राईव्ह सुरु केली आहे. इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. हेल्थकेअर वर्कर्स, बस ड्रायव्हर, फेरीवाले अश्या सर्वांचे चाचण्या केल्या जात आहे. जरी रुग्णसंख्या वाढलीच तर पालिका सज्ज आहे. ऑक्सिजनचा पुरेसा साठा, पुरेसे बेड्स, औषधं, डॉक्टर्स अशी सर्व सुविधा उपलब्ध आहे असे ही काकाणी यांनी सांगितले आहे.

औषधांचा पुरेसा साठा- 

आम्ही सर्व कोविड केंद्रातील औषधांच्या साठ्याबद्दल आढावा घेतला. कोणत्याही कोविड केंद्रांत औषधांचा तुटवडा नाही. आकडेवारीसह सर्व औषधांची माहिती उपलब्ध आहे. दहिसरच्या कोविड केंद्रात 800 बेड्स असून तिथे आता फक्त 160 रुग्ण होते. म्हणजेच , आता रुग्णांची संख्या ही कमी झाली आहे. मात्र, असे असले तरी पालिका सर्व सुविधेसह दुसर्या लाटेसाठी तयार आहे असे ही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. 

राज्य नियुक्त टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले की, संभाव्य दुसर्‍या लाटेमुळे ते चिंताग्रस्त आहेत. “कोरोना व्हायरस हिवाळ्यात बर्यापैकी वाढतो. युरोप आणि अमेरिकेनंतर दिल्लीतही हाच अनुभव आला आहे. आता ख्रिसमस आणि नवीन वर्ष येऊ लागले आहे. त्यामुळे, रुग्णसंख्या वाढू शकते. "

Beware Mumbaikar Gradual increase in covid patients after Diwali BMC ready for medicine, testing, treatment 

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com