
Joint Inspection To Identify Mosquito Breeding Sites in City: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि मलेरिया आजाराच्या निर्मूलनासाठी सर्व यंत्रणांनी डास प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. महापालिकेचा किटकनाशक विभाग आणि विविध यंत्रणांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये संयुक्त पाहणी दौरा आयोजित करावा. त्यासाठी समन्वयासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करावा, असे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले.