Mumbai News : 8 वर्षीय चिमुरडीने भैरवगड कडा केला सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhairavgad climbed by 8 year old girl marathi language day mumbai

Mumbai News : 8 वर्षीय चिमुरडीने भैरवगड कडा केला सर

डोंबिवली - मराठी राजभाषा दिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेल्या ग्रीहिता विचारे या 8 वर्षीय चिमुरडीने भैरवगड कडा सर करत पुन्हा एकादा दैदिप्यमान कामगिरी करत शहराचे नाव उंच केले आहे.

भैरवगड म्हंटल तर किमान 2 तासांची दमछाक, रॉक कट क्लायंबिंग आणि झिप लाइन आली ह्या सर्व अडचणी वर मात करत ग्रीहिता ने यशस्वी कामगिरी करून दाखवली. मुरबाड तालुक्यातील वसलेला भैरवगड हा भल्याभल्यांना आव्हान देत असतो. किमान 3 हजार फुटांवर असलेला भैरवगड हा गाठण्यासाठी घनदाट जंगलातून पायपीट करत कड्याच्या पायथ्याशी पोहचावे लागते.

ग्रीहिताने हे सर्व अडथळे पार केले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ऊन वाढायच्या आधी गड सर करायचे ठरले. पहाटे 5 वाजताच टीम गडाच्या पायथ्याशी पोहोचली. दोन तासात गड चढण्यात आला. त्यानंतर सुमारे 300 हा कडा असून बेस पासून ते कड्याचे अंतिम टोक ग्रीहिताने अर्धा ते पाऊण तासात सर केले असल्याची भूषण पवार यांनी दिली.

ग्रीहिता च्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे तिचे वडील सचिन विचारे ह्यांची देखील ग्रीहिता च्या कामगिरीला मोलाची साथ लाभली आहे. या आधी ग्रीहिताने वजीर,नवरा नवरी सुळके सर केले आहे. त्यासोबत माऊंट एवरेस्टच्या बेस कॅम्पला जाणारी सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून तिची ओळख आहे.

ग्रीहिता ला ही कामगिरी फत्ते करण्यासाठी तांत्रिक मदत करणारे महादुर्ग ऍडव्हेंचरचे भूषण पवार, सागर डोहळे, अक्षय जमदरे, नितेश पाटील, योगेश शेळके, विकी बुरकुले, कल्पेश बनोटे, ऋतुजा नेरकर आणि महाराष्ट्र रेंजरचे किशोर माळी ह्यांची मोलाची साथ लाभली.

महादुर्ग ऍडव्हेंचर ह्या साहसी संघाच्या सयंसेवकांना गिर्यारोहण क्षेत्रात 3 वर्षांचा अनुभव असल्याने आणि तांत्रिक गोष्टींचे ज्ञान असल्याने कुठे ही कंचित ही भीती लहान मुलांच्या मनात निर्माण होत नाही. त्यामुळे गिर्यारोहण सुरक्षित पार पडते असे महादुर्ग ऍडव्हेंचर चे संस्थापक भूषण पवार ह्यांनी सांगितले.