esakal | १० दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीस भांडुप पोलिसांनी केली अटक | Bike robbery
sakal

बोलून बातमी शोधा

Two-wheeler thief arrested

१० दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीस भांडुप पोलिसांनी केली अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चेंबूर : भांडुप रेल्वेस्थानकातून (bhandup railway station) दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला भांडुप पोलिसांनी (bhandup police) अटक केली (thief arrested) असून त्याने अन्य १० दुचाकी (bike robbery) चोरल्याचीही कबुलीही दिली आहे. भांडुप परिसरात रहाणारे तक्रारदार अभिजित कदम यांनी त्यांची दुचाकी भांडुप स्टेशनजवळ उभी केली होती. ती चोरी गेल्याने त्यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा: वाशी रेल्वे पोलिसांनी पकडला मोबाईल चोर; सापळा लावून अटक

या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसी टीव्ही फुटेजची पाहणी केली. तांत्रिक मदतीने ओळख पटवून आरोपीला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने भांडुप, मुलुंड परिसरातून एकूण १० दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांची किंमत ४ लाख २५ हजार इतकी आहे.

loading image
go to top