Bhandup Hospital fire: उद्धव ठाकरेंनी दिलं ठरलेलं उत्तर

uddhav.jpg
uddhav.jpg

भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला काल रात्री भीषण  आग लागली. रात्री १२ च्या सुमारास ही आग लागली होती. या आगीत होरपळून १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

"मागच्यावर्षी कोविड स्थितीमुळे रुग्णांवर तात्काळ उपचार व्हावेत, म्हणून काही हॉस्पिटल्सना परवानगी दिली होती. सनराईज हे अशाच रुग्णालयांपैकी एक मॉलमध्ये बनलेलं हॉस्पिटल आहे. आपली आरोग्य सुविधा व वाढती साथ लक्षात घेऊन, राज्यभर जिथे-जिथे गरज आहे, तिथे आवश्यकतेनुसार कोविड सेंटरसाठी परवानगी दिली होती. सनराईज हॉस्पिटलला तात्पुरती परवानगी होती. ती ३१ तारखेला संपणार होती" असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

"हॉस्पिटलच्या खाली असणाऱ्या दुकानात आग लागली. ती पसरत वर हॉस्पिटलपर्यंत आली. जिथे कोरोना रुग्ण अॅडमिट होते. त्यांना बाहेर काढण्यायाचा प्रयत्न झाला. पण व्हेंटिलेटरवरच्या रुग्णांना हलवण्यालसाठी वेळ लागला. दुर्देवाने त्यात त्यांचा मृत्यू झाला" असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

"अशी दुर्घटना घडल्यानंतर आपण सगळे जागे होतो. चौकशी लागते, या बाबतीत चौकशी केली जाईल. जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यात दुर्लक्ष, दिरंगाई झाली असेल, तर जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई करु" असे उद्धव ठाकरे यांनी ठरलेलं उत्तर दिलं.  

"आता करोना स्थितीचा मुकाबला करण्यासाठी जे हॉस्पिटल्, जम्बो हॉस्पिटल्स उभारलेत तिथे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी मी स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिलेत" असे उद्धव ठाकरे म्हणाले. "या अग्नि दुर्घटनेत ज्यांचं कौटुंबिक नुकसान झालय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो" असे ठाकरे म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com