Bharat Bandh: भारत बंदला पनवेल परिसरात संमिश्र प्रतिसाद

Bharat Bandh: भारत बंदला पनवेल परिसरात संमिश्र प्रतिसाद

मुंबईः  केंद्र सरकारच्या कृषी विषयक धोरणाविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याकरिता पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पनवेल परिसरातून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. महविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेल्या निदर्शना दरम्यान करण्यात आलेल्या घोषणाबाजी व्यतिरिक्त सर्वत्र शांततेत आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांकरिता तयार केलेल्या कृषी धोरणाला देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. देशभरात कायद्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने सुरु असलेल्या या निदर्शनांमध्ये काँग्रेससहित इतर विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दर्शवत मंगळवारी आयोजित भारत बंदमध्ये सहभाग घेतल्याने पनवेल परिसरात देखील या बंदचा काही प्रमाणात परिणाम पाहायला मिळाला आहे. बंद दरम्यान शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

विरोधी पक्षामार्फत पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये शहरातील रिक्षा व्यावसाईक सामील झाले नसल्याने शहरातील रिक्षा, टॅक्सी तसेच इतर प्रवासी वाहतूक सुरळीतपणे सुरु असल्याचे पाहायला मिळाले.

 व्यापाऱ्यांना आवाहन

शेतकऱ्यांच्या निदर्शनांना पाठिंबा दर्शवण्याकरिता शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन महविकास आघाडीतील पक्षांमार्फत करण्यात आल्यानंतर देखील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरु ठेवल्याने महविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्वत्र फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना दिसत होते.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bharat Band Updates panvel Composite response for bandh

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com