रस्त्यांची नाकाबंदी, पेट्रोल पंपांवर बहिष्कार; भारत बंदसाठी जनआंदोलन सज्ज!

कृष्ण जोशी
Saturday, 5 December 2020

दिल्लीमध्ये 500 संघटनांच्या एकजुटीतून निर्माण झालेल्या किसान संघर्ष मोर्चाने केन्द्र सरकारच्या कृषीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी भारत बंदचा नारा दिला आहे

मुंबई, ता. 5 : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी होणाऱ्या भारत बंदमध्ये सहभागी होणाऱ्या जन आंदोलनाची संघर्ष समितीने (महाराष्ट्र) पूर्वतयारी केली असून दिल्लीकडे जाणारे रस्ते  रोखणे, रिलायन्सच्या पेट्रोल पंपांवर बहिष्कार घालणे आदी उपाय योजण्याची तयारी सुरु आहे. 

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, स्वराज अभियान, असंघटीत कामगार संघर्ष समन्वय समिती, लोकायत व सुमारे सत्तर जनसंघटनांची मिळून जनआंदोलनांची संघर्ष समिती ( महाराष्ट्र ) बनली आहे. राज्यातील साहित्यिक, कलाकार आदींनीदेखील शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्यात येईल. 

महत्त्वाची बातमी : मराठा आरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

दिल्लीमध्ये 500 संघटनांच्या एकजुटीतून निर्माण झालेल्या किसान संघर्ष मोर्चाने केन्द्र सरकारच्या कृषीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी भारत बंदचा नारा दिला आहे. तो बंद महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी संघर्ष समितीने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातून दिल्लीकडे जाणारे रस्ते अडवणे, केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणाबाबत प्रसारमाध्यमांच्या साह्याने जनजागृती करणे, पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही रिलायन्सच्या पेट्रोल पंपांवर बहिष्कार घालणे, आदी उपाय योजले जातील. 

मुंबईतील  सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai
 
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 130 कोटी जनतेची अन्नसुरक्षा धोक्यात येईल, अशीही समितीला भीती आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे खासगीकरण झाल्यास त्यांची गोदामे खासगी उद्योजकांकडे जातील व सार्वजनिक धान्यवितरण व्यवस्था संपुष्टात येईल, असाही समितीचा दावा आहे. वीज कायदा 2020 नुसार देशातील वीज उद्योगाचे खासगीकरण केले जाणार आहे, त्याचाही तीव्र विरोध करण्याची गरज आहे. राज्य सरकारमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष बंदमध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षाही समितीचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी व्यक्त केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

to make farmers protest bharat bandh 2020 successful various organizations in maharashtra ready


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharat bandh date 2020, bharat bandh tomorrow 2020, bharat bandh today, bharat bandh 2020, bharat bandh latest news, wednesday bharat bandh, is bharat bandh confirmed tomorrow 2020,live news on bharat bandh today