मराठा आरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

दीपा कदम
Saturday, 5 December 2020

ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल

मुंबई, ता. ५ : एसईबीसी (SEBC) आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे. 

महत्त्वाची बातमी : माझी वसुंधरा' अभियानात लोकसहभाग वाढवा; अदित्य ठाकरे यांचे आवाहन

अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समन्वय समितीमध्ये ऍडव्होकेट आशिष गायकवाड, ऍडव्होकेट राजेश टेकाळे, ऍडव्होकेट रमेश दुबे पाटील, ऍडव्होकेट अनिल गोळेगावकर व ऍडव्होकेट अभिजीत पाटील यांचा समावेश आहे.

महत्त्वाची बातमी : कोरोना लस साठवणूकीसाठी मुंबई महापालिका सज्ज; महापौरांकडून कांजुरमार्गच्या जागेची पाहणी

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा.

मुंबईतील  सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai

ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल.

maratha reservation in SC team of advocates declared for the hearing of ninth december 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha reservation in SC team of advocates declared for the hearing of ninth december