Bharat Jodo Yatra : भाजपकडून गांधी कुटुंब नेहमीच टार्गेट - नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाना पटोले

Bharat Jodo Yatra : भाजपकडून गांधी कुटुंब नेहमीच टार्गेट ; नाना पटोले

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान सुरक्षेत चूक केल्यामुळे काँग्रेस नेते के.सी. वेणूगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सुरक्षेच्या चुकीबाबतची तक्रार केली. त्यावर सीआरपीएफने राहुल गांधींनी ११३ वेळा सुरक्षा घेरा तोडल्याचे म्हटले. व त्यामुळे त्यांची सुरक्षा कमी होत असल्याचे केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे म्हणणे आहे. परंतु, हे सर्व प्रकार पंतप्रधान मोदीदेखील करतात. मग सुरक्षा खात्याने त्यांचीदेखील सुरक्षा कमी करावी, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

गांधी कुटुंबाला नेहमीच भाजपकडून टार्गेट केल्या जाते. मग त्यात सोनिया गांधी असो किंवा राहुल गांधी असो. त्यांची सुरक्षा कमी करणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे तसेच इतक्या वर्षात काँग्रेसने व गांधी कुटुंबानेच देशाला मागे टाकल्याचा आरोप भाजपकडून केल्या जातो. मात्र, गेल्या ९ वर्षांपासून देशाचे पंतप्रधान मोदी हे महागाई, बेरोजगारी तसेच उद्योग हे सर्व आलबेल असल्याचे दाखवत असून देशाची फसवणूक करीत आहेत, असे पटोले म्हणाले.

राज्य सरकार सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांची व विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत आहे. उद्योगपतींसाठी यांच्याकडे पैसा आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी पैसा नाही. विधानसभा अध्यक्ष हे विरोधी पक्षाला प्रश्न मांडू देत नाही, असे अध्यक्ष आणखी काही दिवस राहिले तर त्यांच्यावर अविश्वास आणण्याचे नियम आम्ही तपासत आहोत असंही पटोले यांनी सांगितलं.