राहुल गांधी यांच्या विरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे डोंबिवलीत जोडे मारो आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai : राहुल गांधी यांच्या विरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे डोंबिवलीत जोडे मारो आंदोलन

डोंबिवली : भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांचा अवमानकारक व खोटा बदनामीकारक इतिहास सांगितल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. डोंबिवली मध्ये शिंदे गट समर्थक बाळासाहेबांच्या डोंबिवली व कल्याण ग्रामीण मधील शिवसैनिकांनी इंदिरा चौकात राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली.

त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे.तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय. काँग्रेस नेते राहुल गांधी यानी सावरकर यांच्यावर टिका करून सावरकरांचा व हिंदु प्रेमीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना डोंबिवली व कल्याण ग्रामीणच्या वतीने कॉंग्रेस नेते गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले.

यावेळी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील, सागर जेधे यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. राहुल गांधी यांचे वय नसेल तेवढे वर्षे सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. त्यांची कुवत नाही सावरकर यांच्याबद्दल बोलण्याची म्हणून आज त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जोडे मारोआंदोलन करत निषेध केला असल्याचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले.