Bharat Gogawale-Aaditya Thackeray : भरत गोगावलेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharatshet Gogawale criticize Aaditya Thackeray statement politics mumbai

Bharat Gogawale-Aaditya Thackeray : भरत गोगावलेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

अलिबाग : दररोज वेगवेगळे आरोप करणारे आम्हाला गद्दार, नामर्द म्हणत आहेत; मात्र ज्यांचे लग्नच झालेले नाही, त्यांना दुसऱ्यांना नामर्द म्हणण्याचा अधिकार नाही, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केला. त्यांनी ठाकरे गटाकडून केलेल्या वेगवेगळ्या आरोपांचा खरपूस समाचार घेताना दसरा मेळावा कोणत्याही परिस्थितीत होणारच असून कोणतीही ताकद हा मेळावा रोखू शकणार नसल्याचे सांगितले. ठाकरे गटाकडून करण्यात येणाऱ्या आरोपांचा बदला घेण्याची वेळ आली असून दसरा मेळाव्यात शिवसेनेची खरी ताकद दाखवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाल्याचे त्यांनी सांगितले.

अलिबाग येथे आयोजित रायगड जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीत ते बोलत होते. भरत गोगावले यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी आणि आगामी निवडणुकांसदर्भात आढावा घेण्यासाठी ही बैठक गुरुवारी अलिबाग येथे आयोजित करण्यात आली होती.

Web Title: Bharatshet Gogawale Criticize Aaditya Thackeray Statement Politics Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..