"किरीट सोमय्या यांना भाजपही सिरियसली घेत नाही" अनिल परब यांनी सोमय्यांना सुनावलं

सुमित बागुल
Friday, 30 October 2020

किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर माध्यमांशी बोलताना परिवहन अनिल परब म्हणालेत की, किरीट सोमय्या यांना त्यांचा भारतीय जनता पक्ष देखील सिरियसली घेत नाही.

मुंबई : मुंबईत कोविड सेंटर्स उभारताना शिवसेनेकडून तब्बल १२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप मुंबईतील भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. यावर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना सुनावलं आहे. किरीट सोमय्या यांचं कामच आरोप करणे आहे. पण त्यांना स्वतः भाजपाही गंभीरपणे घेत नाही असा नसल्याचा टोला लगावलाय.

आज महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला यावेळी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना खडेबोल सुनावलेत. यावेळी भाजपने राजकारण करू नये असा सल्लाही त्यांनी दिलाय. 

महत्त्वाची बातमी : मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करताना BMC कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

काय आहेत सोमय्यांचे आरोप : 

मुंबईत कोविड सेंटर्स उभारताना शिवसेनेकडून तब्बल १२ हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. 5000 खाटांचे रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा केला गेलाय असं सोमय्या म्हणतात. मुख्यामंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून महापालिका आयुक्तांनी 72 तासांच्या आत खासगी बिल्डरची जागा तीन हजार कोटींमध्ये विकत घेण्याचा प्रस्ताव पास केला असा आरोप सोमय्यांनी केलाय. 

अनिल परबांचं उत्तर : 

किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर माध्यमांशी बोलताना परिवहन अनिल परब म्हणालेत की, किरीट सोमय्या यांना त्यांचा भारतीय जनता पक्ष देखील सिरियसली घेत नाही. किरीट सोमय्या यांचं केवळ आरोप करणे हे एकच काम आहे. सध्याच्या काळात भाजपने कोणत्याही मुद्दयांवर राजकारण करू नये असंही अनिल परब म्हणालेत.   

bhartiya janata party also dont take kirit somayya very seriously says anil parab
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhartiya janata party also dont take kirit somayya very seriously says anil parab