esakal | मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करताना BMC कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करताना BMC कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सगळीकडे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पाहायला मिळत आहे.

मास्क न घालणाऱ्यावर कारवाई करताना BMC कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सगळीकडे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. अशात आपल्याच हलगर्जीपणामुळे कोरोनाचा पुन्हा फैलाव होऊ शकतो हे अनेकांना ठाऊक असूनही त्यावर अंमलबजावणी होताना दिसत नाही. अजुन कोरोनावर कोणतंही औषध उपलब्ध नाही. अशात मास्क हाच सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नागरिकांनी मास्क घालावा आणि कोरोनापासून स्वतःचं आणि इतरांचं रक्षण व्हावं म्हणून प्रशासनाकडून अनेक पावलं उचलली जातायत. मात्र अनेकांकडून यामध्ये थेट दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे. 

मुंबईमध्ये मास्क न घालणाऱ्यांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येतेय. मास्क न घालणाऱ्यांकडून महापालिका २०० रुपये दंड वसूल करते आहे. कुणाकडे दंड भरण्याचे पैसे नसतील तर त्यांना मुंबईत साफसफाई सारखी कामे करावी लागतायत.

महत्त्वाची बातमी : एक गाव नेटवर्क विना! सायवनमधील ग्रामस्थ सुविधांपासून दूर, प्रशासकीय कामांचा घोळ

अशीच कारवाई करत असताना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर काही मास्क न घालणाऱ्या फेरीवाल्यांनी कोयता उगारत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मास्क न परिधान करणाऱ्यांवर मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई सुरू आहे. दरम्यान आज जी नॉर्थ विभागाचे सुपरवायझर उन्मेष राणे यांच्यावर एका फेरीवाल्याकडून थेट प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

नाकी काय आहे प्रकरण

आज जी नॉर्थ विभागाचे सुपरवायझर उन्मेष राणे मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करत होते. एकावर कारवाई सुरु असताना तिथे त्याचा भाऊ आला आणि त्याने थेट राणे यांच्यावर कोयता उगारून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कारवाईवेळी मुंबईतील रस्त्यावर या व्यक्तीकडून मोठा तमाशाही करण्यात आला. त्याने स्वतःचे कपडे देखील फाडून घेतलेत. या व्यक्तीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या सार्वजनिक कामांनाही नकार दिला होता. सदर घटनेमुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं.

महत्त्वाची बातमी : रेल्वे प्रवासात मास्क बंधनकारक; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

BMC कडून ज्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे त्याचे नाव प्रथमेश जाधव असून त्याचं वय २९ वर्षे आहे. मास्क न वापरणे आणि प्रशासकीय कामांमध्ये अडथळा आणण्याचे आरोप त्यावर आहेत. त्यावर IPC कलम 186,188 अंतर्गत त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

drunk feriwala tried to threatened bmc worker while taking action for not wearing mask

loading image
go to top