मुंबईच्या ...'या' भागात सुरू झालीये रो-रो सेवा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी अशी रो-रो सेवा म्हणजे महाराष्ट्राच्या जलवाहतूक सेवेतील मैलाचा दगड ठरेल. राज्याच्या किनारपट्टीवरील फायदेशीर ठरणारी अशी जलवाहतूक सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. १५) दिली.

मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी अशी रो-रो सेवा म्हणजे महाराष्ट्राच्या जलवाहतूक सेवेतील मैलाचा दगड ठरेल. राज्याच्या किनारपट्टीवरील फायदेशीर ठरणारी अशी जलवाहतूक सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. १५) दिली.

ही बातमी वाचली का? सुंदर गडकिनारे, गड सुनेसुने

भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो पॅक्‍स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा रविवारी सुरू करण्यात आली. त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या संदेशात अशी ग्वाही देण्यात अाली. कोरोना संसर्ग लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम होणार नाही, असे शनिवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. कार्यक्रमासाठी न थांबता प्रवाशांच्या सोयीसाठी लगेच सेवा सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. सेवेला रविवारी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

ही बातमी वाचली का? शिवसेनेच्या मास्टरस्ट्रोकने भाजप, मनसे घायाळ!

रो-रो सेवेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून मांडवा जेट्टीत १५० कोटी रुपये खर्चून सुविधा निर्माण केल्या आहेत. नवी मुंबईतील नेरूळ आणि बेलापूर येथूनही लवकरच जलवाहतूक सुरू करण्याची तयारी आहे. भाईंदर ते डोंबिवली जलवाहतुकीच्या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळून दोन वर्षांत ही सेवा सुरू होईल. जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटन व रोजगार वाढवला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

ही बातमी वाचली का? कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस? 

तासाभराचा प्रवास
भाऊचा धक्का ते मांडवा हे १९ किलोमीटरचे समुद्री अंतर एका तासात कापता येईल. रस्त्याने जाण्यासाठी मात्र चार तास लागतात. एका वेळी ५०० प्रवासी आणि १४५ वाहने नेण्याची रो पॅक्‍सची क्षमता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhaucha dhakka to Mandawa Ro-Ro Navigation services launched