सुंदर समुद्रकिनारे, गड सुनेसुने 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

अलिबाग, वरसोली, नागाव, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर हे समुद्रकिनारे दर शनिवार- रविवारी पर्यटकांनी गजबजलेले असतात. कोरोनाच्या भीतीने ते ओस पडले. कुलाबा किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटनाची संख्याही कमालीची घटली होती, अशी माहिती अलिबाग येथील व्यवसायिक संकेत पाटील यांनी दिली.

रोहा ः राज्यातील पर्यटकांचा आवडता जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटनावर कोरोचा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात गड, किल्ल्यांबरोबरच समुद्रकिनारे ओस पडले आहे. पर्यटकांची संख्या अचानक रोडावल्याने रिसोर्ट, हॉटेल, खानावळीमालक चिंतेत आहेत. 

जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, नागाव, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर हे समुद्रकिनारे दर शनिवार- रविवारी पर्यटकांनी गजबजलेले असतात. कोरोनाच्या भीतीने ते ओस पडले. कुलाबा किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटनाची संख्याही कमालीची घटली होती, अशी माहिती अलिबाग येथील व्यवसायिक संकेत पाटील यांनी दिली. मुरूड चौपाटीवर पर्यटकांच्या पाऊलखुणा उमटल्याच नाहीत. जंजिरा दर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची वाट पाहण्यातच बोटचालकांचा दिवस गेला, अशी माहिती मुरूड येथील नाविक राम नाखवा यांनी दिली. 

श्रीवर्धन समुद्रकिनारीही पर्यटकांची वाणवा होती. त्यामुळे नौकानयन व इतर जलक्रीडा करणारे पर्यटक पाण्यात दिसलेच नसल्याचे श्रीवर्धन येथील नागरिक प्रणय ठाकूर यांनी सांगितले. 

माणगाव तालुक्‍यातील देवकुड धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची घट झाली असून अनेक व्यवसाईकांनी हॉटेल, खानावळी बंद ठेवल्या असल्याचे कुंडलिका भोजनालायचे मालक प्रशांत शेलार यांनी सांगितले. 

धक्कादायक : खेळत होती चिमुकली...अचानक असे घडले...

कुंडलिका नदीवरील रिव्हर राफटिंगसाठी दर शनिवार रविवारी 400 ते 500 पर्यटक येतात; मात्र दोन दिवस पर्यटकांची संख्या 200 सुद्धा पूर्ण नव्हती. अनेक पर्यटकांनी बुकिंग रद्द केली असल्याचे रॉकहिल रिसोर्टचे व्यवस्थापक सुयश घावटे यांनी सांगितले. अशीच परिस्थिती कर्जत, रोहा, तालुक्‍यात फार्म हाऊस व रिसॉर्ट परिसरात होती. कर्जत स्टेशन व नेरळ एसटी स्टॅंडवर आज अजिबात गर्दी नसल्याची माहिती कर्जत येथील व्यावसायिक महेंद्र मोगरे यांनी दिली. 

हे वाचा : दीक्षाभूमीचा सजग प्रहरी...

त्याचा फटका, स्थानिक खानावळी, अल्पोपाहार केंद्रे, हॉटेल व रिसोर्ट व्यवसायिक, वाहतूकदार आणि रिक्षावाले, गाईड व हमाल यांना बसला, अशी माहिती व्यवसायिकांनी दिली. 

रायगड जिल्ह्यातील कुंडलिका खोरे, समुद्रकिनारे आणि डोंगराळ भागातील रिसोर्ट, फार्महाऊस व्यवसायावर कोरोना व्हायरस आजाराचा प्रभाव पडला आहे. व्यवसाय निम्म्याहून अधिक खाली घसरला आहे. 
- सुयश घावटे, व्यवस्थापक, रॉकहिल रिसोर्ट, सुतारवाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist footprints have not been seen on Murud Chowpatty