esakal | संरक्षक कठड्यालाच कारची धडक
sakal

बोलून बातमी शोधा

भाईंदर : कारने दिलेल्या धडकेमुळे तुटलेला लोखंडी संरक्षक कठडा.

मिरा रोड : उत्तन परिसरातील डोंगरी खदानजवळील जुन्या विहिरीची भिंत कोसळून सहा महिन्यांपूर्वी रस्ता खचला होता. त्या ठिकाणी पालिकेने सुरक्षिततेसाठी लोखंडी कठडा बांधला; मात्र रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेशी प्रकाशाची व्यवस्था नसल्याने शनिवारी (ता.८) रात्रीच्या सुमारास उत्तन येथे कारने दिलेल्या धडकेत लोखंडी कठडा तुटल्याची घटना घडली. या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

संरक्षक कठड्यालाच कारची धडक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरा रोड : उत्तन परिसरातील डोंगरी खदानजवळील जुन्या विहिरीची भिंत कोसळून सहा महिन्यांपूर्वी रस्ता खचला होता. त्या ठिकाणी पालिकेने सुरक्षिततेसाठी लोखंडी कठडा बांधला; मात्र रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेशी प्रकाशाची व्यवस्था नसल्याने शनिवारी (ता.८) रात्रीच्या सुमारास उत्तन येथे कारने दिलेल्या धडकेत लोखंडी कठडा तुटल्याची घटना घडली. या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

ब्रेकअपनंतर बर्गर फ्री, वाचा काय आहे गुड न्यूज... 

गेल्या पावसाळ्यात येथील रस्ता खचल्याने या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी पालिकेने संरक्षित लोखंडी कठडा बांधला. हा परिसर एमएमआरडीएच्या विशेष पर्यटन क्षेत्रात गेल्याने रस्त्याचे बांधकाम एमएमआरडीएकडून होणे अपेक्षित असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले; मात्र अद्याप या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील अपघाताची शक्‍यता बळावली असतानाच काल रात्रीच्या सुमारास कारचा अपघात झाला. 

कल्याण-डोंबिवलीकरांची उन्हाळ्यातील वणवण थांबरणार

कठडा तोडून कार आणखी पुढे गेली नाही; अन्यथा तेथील मोठ्या खड्ड्यात ती जाऊन मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी व्यक्त केली. दरम्यान या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एमएमआरडीएकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी उत्तन परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत असून मिरा-भाईंदर महापालिकेने लवकरात लवकर या ठिकाणी रस्ता बनवावा, अशी त्यांची मागणी आहे.

loading image
go to top