ब्रेकअप नंतर बर्गर फ्री, वाचा काय आहे गुड न्यूज...!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

मुंबई -  मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही बातमी जरा नीट वाचा. कारण ही बातमी वाचल्यावर कदाचित तुम्ही देखील एक बर्गर खायला जाल. बरं सध्या valentine week सुरु आहे. अशातच या आठवड्यात तरुणाई वेगवेगळे दिवस साजरे करत असतात. याचंच अवचित्य आणि एका सिनेमाचं प्रमोशन म्हणून 'बर्गर किंग'कडून एक खास ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला एक फ्री बर्गर खायला मिळणार आहे.

मोठी बातमी - 'या' नणंद-भावजयीचं होतंय कौतूक...; वाचा का ते...

'बर्गर किंगच्या'या खास ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला आता एक बर्गर फ्री देण्यात येणार आहे. यासाठी फक्त एकच अट आहे, 'ती म्हणजे तुमचं ब्रेकअप झालेलं असायला हवं'. होय जर तुमचं ब्रेकअप झालं असेल तर तुम्हाला बर्गर किंग कडून एक बर्गर फ्री मिळणार आहे. 

कसा मिळवाल फ्री बर्गर ? 

तुम्हाला जर मोफत बर्गर खायचं असेल तर तुम्हाला तुमचं ज्या व्यक्तीसोबत ब्रेकअप झालंय त्यासोबतचा फोटो काउंटरवर दाखवायला लागणार आहे. एक लहानशी प्रोसेस करून तुम्हाला फ्री बर्गर खायला मिळू शकतो. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वीच्या तुमच्या एक्सचा फोटो जर तुमच्या मोबाईलमध्ये अजूनही असेल, तर तुम्ही तो दाखवून मोफत बर्गर मिळवू शकतात. 

मोठी बातमी - धावत्या लोकलवर फेकली जातायत कुत्र्याची पिल्लं

ही नवीन ऑफर 'बटस' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी देण्यात आलेली आहे. या ऑफरला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद देखील मिळतोय. दरम्यान भारतीयांना जर हा मोफत बर्गर खायचा असेल तर अमेरिकेत जावं लागेल कारण ही ऑफर अमेरिकेत काही मोजक्या दुकानांमध्ये सुरु आहे. 

show photo of your ex and get free burger from burger king

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: show photo of your ex and get free burger from burger king