
उल्हासनगर : 17-डिसेंबर 2024 मध्ये सुप्रसिद्ध खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यापासून उल्हासनगरातील ॲड.जय गायकवाड संस्थापीक स्वराज्य संघटना ही विविध सामाजिक उपक्रमांनी अल्पावधीतच कमालीची प्रकाशझोतात आली आहे.या संस्थेने आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात तीन पोलीस अधिकाऱ्यांना भिमरत्न पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेतली आहे.