भीमा कोरेगाव प्रकरण: शरद पवारांनी बोलावली काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

पूजा विचारे
Thursday, 10 September 2020

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक सुरु आहे. भीमा कोरेगावच्या मुद्दयावर चर्चेसाठी पवारांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना बोलावले आहे. 

मुंबईः भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक सुरु आहे. भीमा कोरेगावच्या मुद्दयावर चर्चेसाठी पवारांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना बोलावले आहे.  भीमा कोरेगाव आयोगाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, तर काँग्रेसकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित आहे. तसंच गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव अमिताभ गुप्ताही उपस्थित आहेत.

याआधी शरद पवारांनी आरोप केला होता की, भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीनं झाला असून निरपराध व्यक्तींना त्यात गुंतावण्यात आले आहे. तसंच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणाटी चौकशी एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतली होती.

हेही वाचाः  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा कोरोना रिपोर्ट आला, वाचा सविस्तर

दरम्यान या बैठकीआधी शरद पवार यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत २० मिनिटं चर्चा केली. या चर्चेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Bhima Koregaon case Sharad Pawar called meeting of Congress NCP ministers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhima Koregaon case Sharad Pawar called meeting of Congress NCP ministers