
Sharad Pawar: भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीनुसार, पवार यांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत त्यांच्याकडील कागदपत्रे आणि पुरावे आयोगासमोर सादर करावेत किंवा स्वतः अथवा वकिलांमार्फत हजर राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.